Shivsena Dasara Melava 2024: मुंबईतील आझाद मैदानावर होत आहे उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आझाद मैदानात धडाडणार तोफ

एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील असलेली शिवसेना बीकेसीच्या एमएमआरडीए च्या मैदानावर दसरा मेळावा घेते परंतु यावर्षी दसरा मेळावा बीकेसी एमएमआरडीएच्या मैदाना ऐवजी आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे.

Ajay Patil
Published:

Shivsena Dasara Melava 2024:- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा यावर्षी तिसरा दसरा मेळावा पार पडणार असून त्यांचा पहिला मेळावा बीकेसी एमएमआरडीच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यासोबतच दुसरा मेळावा आझाद मैदानावर झाला होता व या वर्षी देखील दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून तिसरा दसरा मेळावा देखील आझाद मैदानावरच घेतला जाणार आहे.

जर आपण दसरा मेळाव्याची परंपरा पाहिली तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आजतागायत सुरू आहे व दरवर्षी हा दसरा मेळावा घेण्यात येतो. आपल्याला माहित आहे की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेना स्वतंत्र दसरा मेळावे घेते.

एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील असलेली शिवसेना बीकेसीच्या एमएमआरडीए च्या मैदानावर दसरा मेळावा घेते परंतु यावर्षी दसरा मेळावा बीकेसी एमएमआरडीएच्या मैदाना ऐवजी आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. त्याकरिता आझाद मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू असून पूर्ण तयारी केली जात आहे.

विशेष म्हणजे शनिवारी साजरी होणारी विजयादशमी अर्थात दसऱ्यानंतर कधीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी राज्यात होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांना विशेष महत्त्व आहे.

यापैकी उद्धव ठाकरे यांचा माध्यमातून शिवाजी पार्कवर तर आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या  तोफा कशा पद्धतीने धडाडतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

 एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर राहील प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे?

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरला नाही. एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे व मागच्या वर्षी शिंदे गटाचा दुसरा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. परंतु त्यापूर्वी त्यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हट्ट धरला होता.

परंतु कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना तो अट्टाहास सोडावा लागला. शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली असून जवळपास 50 हजार खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त संख्येमध्ये कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात पोहोचण्याचे निर्देश देण्या सोबतच अशा पद्धतीची तयारी देखील त्या ठिकाणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणामध्ये महाविकास आघाडी व त्यासोबत उद्धव ठाकरेंचा कडक शब्दात समाचार घेतील यात शंकाच नाही. शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सतत सुरू आहे व आता ऐन निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणल्याने

त्याचा फायदा या निवडणुकीत महायुतीला होण्याचा अंदाज जास्त असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक सरकारी योजनांचा पाढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचतील व यासोबतच केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची प्रशंसा करण्याचे काम सुद्धा करतील.

परंतु मागच्या वर्षी याच आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला स्मरून मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण देण्यात अद्याप देखील यशस्वी ठरले नसल्याने मराठ्यांच्या आरक्षणाबाबत ते काय बोलतात याकडे देखील लक्ष राहणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर 12 ऑक्टोबर 2024 रोजी होत असून त्याची वेळ सायंकाळी साडेपाच वाजेची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe