गडकरी-बावनकुळेंना धक्का

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे.

नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय.

या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं.

यामुळे बावनकुळे यांचा तेली समाज चांगलाच नाराज होता. या नाराजीचा प्रत्यय जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालातून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment