धक्कादायक : या मंत्र्यांच्या निवासस्थानालगत १० कोरोना रुग्ण आढळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण मुंबईत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. पण इकडे नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या नई आबादी भागात दोन दिवसांत १० कोरोना रुग्ण आढळले आहे.

दरम्यान, नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झालेले असतानाच ग्रामीण भागातूनही संशयित रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत.

शहराच्या नई आबादी भागात गुरुवारी ५ रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ शुक्रवारीही त्यात ५ जणांची भर पडली. माहूरलाही एक रुग्ण आढळला त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८९ वर गेली आहे.

गेल्या बुधवारी नांदेडमध्ये २३ जणांना कोरोनासंसर्ग झाल्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यानंतरच्या दोन दिवसांत १४ नवे रुग्ण समोर आले आहेत.

काल आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये चार पुरूष व तीन महिलांचा समावेश असून ते १३ ते ५० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी कोरोनामुक्त होऊ न मुंबईतील आपल्या घरी दाखल झाले. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment