अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे.

सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा, राऊतमळा, गायकवाड मळा, नगर शहरातील गवळीवाडा, फकीर वाडा, झेंडीगेट आणि शहराच्या मध्यवर्ती भागात हे रुग्ण आढळले आहेत.
काल रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला काल 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काल दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवासेमधील 6, अकोले येथील 2, संगमनेरमधील आठ आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews