वृत्तसंस्था :- मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ डिसेंबर रोजी घडली आहे.या पिडीत तरुणावर चार आरोपींनी तब्बल ३ तास चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि नंतर रस्त्यातच फेकून दिलं.
याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि,८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय तरुण कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख पराठा येथे शीख कबाब खाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी एका स्कुटीवरून दोन इसम आले आणि त्यांनी पीडित २२ वर्षीय तरुणाला आम्ही तुला इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे ओळखत असल्याचे सांगितले.
या रेस्टॉरंटमध्ये पोहचताच त्यांनी थेट तरुणाजवळ जाऊन त्याच्याशी बातचीत सुरु केली त्यानंतर त्याला सोबत येण्याची विनंती केली. २२ वर्षीय तरुण त्यांच्या स्कुटीवर दोघांच्या मध्ये बसला आणि तिघेही निघाले. ते श्रद्धा जंक्शनमार्गे होलीस्पिरीट शाळेकडून विद्याविहारकडे निघाले असता २२ वर्षीय तरुणाने गाडीवरून उतरण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र, दोघांनी उतरू दिले नाही. पुढे ते विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक असलेल्या नीलकंठ बिझनेस पार्कजवळ घेऊन गेले. त्याठिकाणी एक पांढऱ्या रंगाची टोयोटो कोरोला कार उभी होती. या कारमध्ये एक इसम अगोदरपासून बसून होता.
स्कुटीवरून घेऊन आलेल्या २२ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि आळीपाळीने तिघांनी अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर चौथा इसम आला आणि तो कार चालवू लागला. चालत्या कारमध्ये असताना तिघांनी त्याच्याजवळील मोबाईल, पर्स काढून घेतले.
त्यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन पीडित तरुणाचे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांचे पेट्रोल भरले आणि २ हजार रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर पीडितेला मारहाण करून मोबाईल आणि पाकीट परत देवून पळ काढत आरोपींनी पीडित तरुणाला गाडीबाहेर रस्त्यावर ढकलून दिले.
मुंबई पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं असून २४ तासांत पोलिसांनी मेहुल परमार (२१), असिफ अली अन्सारी (२३) आणि पियुष चौहान (२२) या तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाला १६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.