औरंगाबाद एका महिलेने गर्भातील बाळ विक्री करणार असल्याची जाहिरात फेसबुकवर टाकली. या जाहिरातीत बाळाची किंमत पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती.
परंतु पोलिसांनी हा प्रकार पाहताच या महिलेले अटक केली आहे. सदर महिला तिच्या भाऊंजीसोबत औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहते, ती सात महिन्यांची गर्भवती आहे.
ती नवऱ्यापासून आता दूर झाली आहे. त्यामुळं पुन्हा लग्न करायचं असेल तर बाळ अडचण ठरू शकतं म्हणून तिनं आणि तिच्या भाऊजींनी पोटातील बाळ विकण्याचं ठरवलं.
त्यासाठी त्यांनी थेट फेसबुकची मदत घेतली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी एक बाळ दत्तक घेण्याचा ग्रुप शोधला,
लोकांचे नंबर मिळवले आणि बाळाची किंमत ठेवली 5 लाख. मात्र, हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि पोलिसांनी हा सगळा प्रकार उघड करीत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.