धक्कादायक ! राहत्यातील पक्ष्यांचा मृत्यू अज्ञात आजाराने

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे, अनेक ठिकाणी पक्ष्यांच्या मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक पशुपालक चिंताग्रस्त झाले होते.

काही दिवसांपूर्वी राहाता शहरालगत माजी नगराध्यक्ष सतीश भोंगळे यांच्या लिंबाच्या बागेत चिमण्या, लव बर्ड, बुलबूल, कोकीळा व तितर हे पक्षी अज्ञात आजाराने जमिनीवर पडून तडफडत असल्याचे या बागेत काम करणार्‍या महिलांना दिसून आले.

याची माहिती त्यांनी बाग मालकास कळवीली. भोंगळे यांनी बागेत जाऊन पाहणी केली असता हे सर्वपक्षी तडफडत मृत पावले याबाबत त्यांनी राहाता येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांच्याशी संपर्क साधला व पक्षी मृत होत असल्याची माहिती दिली.

डॉ.बन यांनी तातडीने बागेत जाऊन पाहणी केली व मृत पक्षी ताब्यात घेतले. चार दिवसांपूर्वी गांधी यांच्या वस्तीवर कावळेही मृत आढळले होते.या प्रकारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरत आहे. कोंबड्याची शेड मोठ्या प्रमाणावर आहे.

सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी बड फ्लूबाधीत अहवाल आल्याने अगोदरच चिंतेत असलेले नागरिक या प्रकारामुळे धास्तावले आहे. यावेळी डॉ बन म्हणाले बर्ड फ्लू हा रोग वन्य पक्षात अधिक दिसून येत असून सदर मृत पक्षी ताब्यात घेतले असून तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जातील असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News