धक्कादायक ! व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर रुग्णालयात बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- समाजात आज विविध घटना घडतात की ज्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या असतात. अनेक घटनांनी शहरे हादरून जातात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात.

महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे.अशीच एक धक्कादायक घटना रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेबाबत घडली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं

रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दाखल करण्यात आलेल्या एका २१ वर्षीय महिलेवर कर्मचाऱ्यानं बलात्कार केल्याच्या घटनेनें परिसर हादरला आहे.

याबाबत हकीकत अशी : पीडित महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं गुरूग्राममधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तिथे तिच्या क्षयरोगावरील उपचार सुरू होते. त्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी एका कर्मचाऱ्यानं हे क्रूर कृत्य केलं.पीडिता काही आठवड्यापासून बेशुद्धावस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने हा सगळा प्रकार वडिलांना सांगितला.

पीडितेचे वडील तिला भेटायला आल्यानंतर तिने बलात्कार झाल्याचं सांगितलं. पीडितेनं एक चिठ्ठी लिहून याची माहिती वडिलांना दिली.

त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सुशांत लोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe