धक्कादायक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- औरंगाबाद मधील जोडवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजपचे कार्यकर्ते हारसिंग काळू गुशिंगे (५५) यांची हत्या करण्यात आली.

सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित चार जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचदिवशी रात्री ९ वाजता गुशिंगे यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला.

यात त्यांचा मृत्यू झाला. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतरच शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी मागणी करत ग्रामस्थांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

अखेर सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांनी गुशिंगे यांचे पार्थिव ताब्यात घेतले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे पॅनल होते.

यात भाजपच्या तीन जागा बिनविरोध आल्या. गुशिंगे यांचे पुतणे संजय रामलाल गुशिंगे याने भाजप गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून त्यांच्या चुलत जावयासह मदन मन्नू जारवाळ,

संजय उत्तम बिमरोट, संजय रायसिंग सत्तावन, विजय रायसिंग सत्तावन, संतोष कडू गुशिंगे, बिजू न्यायालसिंग जारवाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली.

संजयला मारहाण करताना पाहून काका हारसिंग सोडवण्यासाठी गेले असताना त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याने ते खाली कोसळले. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News