अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे पुन्हा एकदा जगभरातील मानवजातीवरील चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे.
मात्र ही लस घेतल्यानंतर काही नागरिकांना त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना अॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस न देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या या लसींमुळे जग कोरोनावर मात करु शकते अशी आशा तयार झाली होती.
मात्र, फायजरची ही लस शरीरातील इम्यून सिस्टमला कोरोना विषाणूशी लडण्यासाठी तयार करते. या लसीमुळे अँटीबॉडी तयार होतात आणि टी-सेल सक्रीय होऊन संसर्ग झालेल्या सेल नष्ट करण्याचं काम करतात. फायजरने 40 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांना 3 टप्प्यातील चाचणीत सहभागी करुन घेतलं होतं.
या चाचणीतही काही प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी त्रास झाल्याचं समोर आलं होतं. अ एफडीएने दिलेल्या माहितीनुसार या फायजर लसीच्या सुरुवातीच्या चाचणीत 4 जणांना अर्धांगवायू झाल्याचं समोर आलं होतं.
या अवस्थेत अर्ध्या चेहऱ्याचे स्नायू निकामी होतात. असं असलं तरी हे अगदी काही वेळेसाठी होतं आणि पुन्हा शरीर सामान्य होतं. हे कशामुळे होतं याचं अद्याप निश्चित कारण समजू शकलेलं नाही. सर्व डॉक्टरांना लसीकरणानंतर काय दुष्परिणाम होतात याचं निरिक्षण करण्यास सांगितलं आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com