धक्कादायक बातमी ! कोव्हिडची अडीच हजार रुग्णालये होणार बंद?; हे’ आहे कारण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने यावर अंकुश ठेवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले.

शासनाने ठरवून दिलेलीच प्रणाली या तुग्णालयांना सक्तीची केली. परंतु आता या पार्श्वभूमीवर आयएमए महाराष्ट्राने मोठी चिंता व्यक्त केली आहे.

कोव्हिड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि मुळीच न परवडणार्‍या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. यामुळे मध्यम आकाराची सुमारे अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

यामुळे सरकारने ही खासगी रुग्णालये चालवावीत, अशी उपहासात्मक मागणी आयएमए महाराष्ट्राने राज्य सरकारकडे केली आहे.

राज्य सरकारने 31 ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे एकतर्फी नवे दर लागू केले आणि आधीचे नियम अधिक कडक केले. दरम्यान,

मंगळवारी आयएमएच्या सदस्यांपैकी सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल नोंदणीच्या प्रती विविध ठिकाणी आयएमए शाखा कार्यालयात जमा केल्या आहेत.

या शाखा राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहेत. सरकारने सक्ती केलेल्या दरानूसार रुग्णालये चालविणे त्यांना परवडणार नाही आणि ही रुग्णालये सरकारनेच चालवावीत आणि स्वत: बनवलेल्या औषधाची चव सरकारने चाखावी, असे आवाहन आयएमएने सरकारला दिले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe