माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी धक्का देणारा निकाल !

Ahmednagarlive24
Published:

प्रभाग सहा अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी एक हजार 712 एवढ्या बलदंड मताधिक्याने विजय मिळविला आहे.

त्यांना 2 हजार 915 मते मिळाली. महाविकास आघाडीच्या अनिता दळवी (शिवसेना) यांना एक हजार 203 मते मिळाली. नोटाला 119 जणांनी पसंती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधित्व करीत असलेला हा प्रभाग असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

एकहाती विजय मिळवीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. या पराभवामुळे महाविकास आघाडीचे नेते आ. संग्राम जगताप, शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्यासाठी हा निकाल धक्का देणारा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment