धक्कादायक! पोलिसठाण्यात मुलीने केली आईविरोधात मारहाणीची तक्रार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-सानपाडा सेक्टर -१९ परिसरात रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार सानपाडा पोलिसांत दिली आहे.

या घटनेतील ११ वर्षीय पीडित मुलगी आई-वडील व लहान बहिणीसह सानपाडा सेक्टर-१९मध्ये राहण्यास आहे. ही मुलगी सहावीत असून तिने तकरारीमद्धे म्हटले आहे की, आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली.

टीव्ही बंद न केल्यास हँगरने, कंगव्याने अथवा कमरेच्या पट्ट्याने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे तसेच एकदा शाळेमध्ये जाताना आईने लाथेने मारहाण केल्याचे या मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

तसेच गरम चमच्याने डाव्या गालावर चटका दिल्याची तक्रार तिने केली. लहान बहिणीलादेखील आई मारहाण करत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

या मुलीने वडिलांच्या मदतीने जिल्हा कुटुंब न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली आहे. त्याची माहिती समजल्यानंतर आईने वडील व मला दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचेदेखील मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment