अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- हॉस्पिटलचं बील वाढविण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे, असे वृत्त एका मीडियाने दिले आहे.
मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाबाबत हा प्रकार घडला आहे. या रुग्णास कोलकत्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.

31 ऑगस्टला त्यांन हॉस्पिटलने 47 हजारांचं बिल दिलं होतं. त्या आधी दोन दिवस रुग्णाचे नातेवाईक पेशंटला पाहू देण्याची विनंती करत होते. मात्र त्यांना पाहू दिलं गेलं नाही.
जेव्हा बिल जमा करण्यात आलं त्यानंतर लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हॉस्पिटलविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गंभीर स्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तोपर्यंत त्यांची कोविड टेस्टही झाली नव्हती.
इथे आल्यानंतर टेस्ट मध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले होते असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. रुग्णाचं पोस्ट मार्टेमही करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved