मुलाच्या लग्नाला दहा दिवस उरले असताना श्रीगोंद्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Published on -

श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली.

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. थोरल्या मुलाचे लग्न २१ तारखेला होते. लग्नाला अवघे दहा दिवस उरले असताना त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe