श्रीगोंदा :- आम आदमी पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा एकदा निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.
यावेळी त्या विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असून श्रीगोंद्यातून विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली आहे.

शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या सय्यद यांनी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंबंधीचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे या बैठकीला शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हेही उपस्थित होते.
सध्या युतीच्या जागा वाटपात भाजपाकडे असलेला श्रीगोंदा मतदार संघ युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाकडे घेण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का
राज्यात भाजप- सेनेची युती निश्चित मानली जाते. प्रत्येकी 135 जागांची दोन्ही पक्षात वाटणी झाली असून घटक पक्षाला 18 जागा देण्याचे यापूर्वीच ठरलेले आहे.
यामध्ये शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी चार जागांवर दावा केला आहे. यात नगर श्रीगोंदा मतदार संघाचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

या मतदार संघात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे चांगले काम असून त्याना उमेदवारी देण्यासाठी मेटे यांनी जोरदार तयारी केली आहे.
दीपाली सय्यद चाहता वर्ग ह्या मतदार संघात असून ही जागा जर शिवसंग्राम पक्षाकडे गेल्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसणार आहे.
- तळीरामांसाठी बॅड न्युज ; विदेशी दारूच्या किंमतीत सरासरी १५० रूपयांची घसघशीत वाढ
- लाडक्या बहिणींची पडताळणी थांबली, ‘या’ तारखेला सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जुलैचे 1500 रुपये !
- राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनांचे पाथर्डी पंचायत समितीवर ‘डफडे बजाव’ आंदोलन
- अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना हिमाचलच्या सफरचंदाची भुरळ
- धरलं तर चावतय… अन् सोडलं तर पळतय….! भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था