श्रीगोंदे :- आमदार राहुल जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात साकळाईबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडली, परंतु ही सूचना साकळाईचा गळा घोटण्यासाठीच होती.
पाच वर्षे आमदार असताना शेवटच्या अधिवेशनात लक्ष्यवेधी का मांडली, असा सवाल पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोतम लगड यांनी बुधवारी केला.

मुळात कुकडी प्रकल्पात पाणी कमी आहे. त्याकरिता आधी कुकडी प्रकल्पातील पाणी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
हीच मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने कुकडीच्या मंजूर सुप्रमामध्ये बोगदा समाविष्ट झाला.
पाचपुते यांच्या विनंतीमुळेच १ जुलैला विधान भवनात साकळाईसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने कुकडी प्रकल्पातील पाणी वाढवण्याबाबत चर्चा झाली.
डिंबे ते माणिकडोह बोगद्याद्वारे अंदाजे दोन टीएमसी पाणी, तसेच समुद्रात जाणारे १.७ टीएमसी पाणी वळवण्याबाबत, तसेच मुख्य कालव्याच्या लाइनिंगची दुरुस्ती करून गळती कमी करून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
त्याबाबत सर्व्हे करण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी तत्काळ दिले. सर्व्हे एक महिन्यात पूर्ण होणार आहे. पाणीउपशासाठी लागणारे विद्युतपंप, विजेचा वापर व लागणारा खर्च कशा पद्धतीने भागवायचा याचाही पाचपुतेंनी अभ्यास केला आहे.
त्यामुळे साकळाईत खीळ घालण्याचे काम आमदारांनी करू नये. कुठलीही तरतूद नसताना खर्चाबाबत प्रश्न निर्माण करून आपण कुठल्या भूमिकेत आहात याबाबत शंका आहे. कमी अभ्यासामुळे जनता मेटाकुटीला आली आहे, असे लगड यांनी नमूद केले.
- Ahilyanagar Politics : विखे – राजळे – कर्डीले – पाचपुतेंत रस्सीखेच ? भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय ‘गेम’
- Maharashtra School News : महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी ! राज्यात आता वारकरी शाळा
- RBI चा ऐतिहासिक निर्णय ! बँकेच्या ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये झाला मोठा बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार?
- लष्करी हद्दीतील समस्यांबाबत खा. लंके यांची बैठक नागरी समस्या तसेच बेलेश्वर, खोपेश्वर मंदिर विकासाचा प्रश्न मार्गी लागणार
- मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! दोन्ही शहरांमधील प्रवास 6 तासांवर येणार, ‘हा’ महामार्ग लवकरच खुला होणार