श्रीरामपुर :- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसरात सोमवारी सकाळी डोक्यात दगड टाकून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेल्या सुरेश वाघमारे या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकारामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज सोमवारी सकाळी श्रीरामपूर शहरालगत असणा-या टिळकनगर हद्दीतील काटवनात एक दगडाने तोंड टेचलेला मृतदेह आढळून आला. या परिसराला जुनी आमराई असेही संबोधले जाते.
सदर मृतदेह सापडल्याचे पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी गेले. सदर तरुणाचा चेहरा दगडाने ठेचलेला आढळून आला. तसेच त्या ठिकाणी रक्ताने माखलेला दगडही आढळून आला.
नंतर सदर मृतदेह हा सुरेश वाघमारे, वय ३४, रा. संघर्षनगर, सूतगिरणी रोड, श्रीरामपूर याचा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर सुरेश वाघमारे याला एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परिवार असल्याचे समजते.
संदीप कांबळे यांच्या संगमनेर रोडवरील भारत गॅस कंपनीत कामास असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आ. कांबळे यांचे खाजगी सचिव तुपे यांच्याशी संपर्क साधला असता सुरेश वाघमारे हा तरुण गेल्या चार वर्षापासून
संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत लेबर म्हणून कामास आहे. शनिवारी ड्युटी संपल्यावर तो नेहमीप्रमाणे घरी गेला. काल रविवारची सुट्टी होती, असेही तुपे यांनी सांगितले.
दरम्यान सुरेश वाघमारे याचा टिळकनगर हद्दीत मृतदेह आढळून आल्यानंतर डिवायएसपी राहुल मदने, पोनि श्रीहरि बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे सांगत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे बहिरट यांनी सांगितले.
दरम्यान सुरेश वाघमारे याचा मृतदेह दुपारी शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील स्मशानभूमीजवळ आणण्यात आला होता. सदर खुनाचा प्रकार कशामुळे घडला याबाबत निश्चित माहिती समजू शकली नाही.
सुरेश वाघमारे याचा मृतदेह टिळकनगरजवळ आढळला. त्याचा खून झाला याची चर्चा जेव्हा परिसरात सुरू झाली त्यावेळी काल रविवारी सुरेश हा कोणाच्यातरी तंदुरीच्या कार्यक्रमाला जाणार होता, अशी माहिती पुढे आली.
सुरेश हा कोणाच्या तंदुरीला जाणार होता हे मात्र दुपारपर्यंत समजू शकले नाही. परंतु जनता हायस्कूल परिसरात सुरेश याच्या एका नातेवाईकाचे घराजवळ त्याची दुचाकी गाडी लावलेली आढळून आली.
त्यामुळे सदर नातेवाईकाला सुरेश हा कधी आणि काय सांगून गेला? हे माहीत असावे, त्यामुळे पोलीस त्याप्रकरणी दुपारी तपास करत होते.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.