श्रीरामपूर : व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या बातमीच्या कारणावरून काल (दि. २४) राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांनी एका नगरसेविकेच्या पतीला चांगलेच फटकारले.
पालिकेच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार सुरू असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी मध्यस्थीचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.
काल (दि. २४) प्रभाग नऊच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला.
या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या एक पदाधिकारी व नगरसेवक महिलेच्या पतीसोबत काही कारणावरून वाद सुरू होता.
व्हॉट्सॲपवर टाकलेल्या बातमीवरून हा वाद उफाळून आल्याचे त्यांच्यातील शाब्दीक चकमकीतून समोर आले.
या महिलेने व्हॉट्सॲपवर बातम्या टाकण्यापूर्वी त्याची खातरजमा करत जा. उगीच काहीही बातम्या टाकू नये, असा इशारा देतानाच
‘आम्ही तुकड्यावर जगत नाही. तुम्ही तुकड्याच्या मागे पळता. यापुढे राष्ट्रवादीत ढवळाढवळ केली तर खपवून घेणार नाही,’ असा सज्जड दमही भरला.
दरम्यान, यावेळी येथे उपस्थित असलेले पक्षाचे शहराध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही दोन शब्द ऐकावे लागल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
याचवेळी निवडणुकीचा जल्लोष करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडायला सुरुवात झाल्याने या वादावर पडदा पडला.
- OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !
- अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…
- MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं
- अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा
- शिर्डी साईबाबा संस्थानच्या कारभारात मोठा बदल ! कारभारासाठी सरकारकडून नवा फॉर्म्युला तयार