श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे.
यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केलेले भाऊसाहेब कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.
याद्वारे सूचक शब्दात त्यांच्यावर टीका केली जात आहे. कांबळेच्या विरोधात श्रीरामपूर शहरासह आसपासच्या भागात रात्रीतून अज्ञात व्यक्तींनी फलक लावले. या फलकांवर ‘आमचं ठरलंय, सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं’ असा मजकूर आहे.
त्यामुळे कांबळेंविरोधात आता जाहीर स्वरुपात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याआधीही त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्यावर स्थानिक स्तरावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता. पण तो आता थंडावल्यानंतर अचानक बॅनरबाजीतून कांबळेंवर टीका सुरू झाल्याने श्रीरामपूर शहर व परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…