अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुंबईहून गोंधवणी गावात आलेल्या चौघांपैकी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असून तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. एक वगळता औरंगाबाद व मुंबई येथून आलेल्या पाहुन्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यात पाच रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत.
त्यामुळे श्रीरामपूरकरांनी कितीही काळजी घेतली असली तरी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामुळे प्रशासनाबरोबर श्रीरामपूरकरांचीही काळजी वाढली आहे.
मुंबई परिसरातील भांडूप येथून एक दाम्पत्य आपल्या मुलासह नातीला घेवून गोंधवणी परिसरात आले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची तपासणी करून एका शाळेत क्वारंटाईन केले. या काळात चौघांना खबरदारी म्हणून नगरला हलविले.
तेथे त्यांचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविले त्यानंतर दाम्पत्याला तेथेच ठेवत मुलगा व नातीला श्रीरामपूरला क्वाॅरंटाईनसाठी पाठविले. त्यांतील ५५ वर्षीय एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
सदर कुटुंब कामानिमित्त मुंबईला राहत होते. कोरोनाच्या कहरात तेथे ५५ वर्षीय व्यक्तीची मुलगी कोरोनाबाधीत झाली. तीला उपचारासाठी रुग्णालयात हलविल्यानंतर संपुर्ण कुटुंबाने धास्ती घेतली.
आणि घाबरलेल्या अवस्थेत गाव गाठले. येथेही कोरोनाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार ते क्वारंटाईन झाले. अवघ्या तीन दिवसात त्यातील एक कोरोनाबाधीत आढळला.
त्यामुळे श्रीरामपूरकरांना मुंबईहून कोरोनाचा प्रसार झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वैजापूरहून श्रीरामपुरातील भंगार गल्लीत स्पेअर पार्ट खरेदी करण्यासाठी आलेली एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली होती.
सदर व्यक्तीच्या संपर्कातील दोघाना नगरला तपासणीसाठी पाठविले होते, सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीरामपूरकारांचा जीव भांड्यात पडला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews