अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने देशभरात जवळपास चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले.
चौथ्या टप्प्यात बऱ्यापैकी सूट देण्यात आली. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता पाचवा लॉकडाऊन करण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्येही साथ आटोक्यात आलेली नसल्याने हा पाचवा लॉकडॉऊन राज्याच्या स्वयंस्फूर्तीने करण्याचा निर्णय केंद्राचा असेल.
देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं आता सरकार 31 मार्चनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
यात देशभरात सापडलेल्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं फक्त 11 शहरांमध्ये आहेत. त्यामुळे ही शहरं वगळता अन्यत्र व्यवहार सुरळीत होय शकतात.
ही ११ शहरे राहू शकतात बंद दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, ठाणे,जयपूर,सुरत ,इंदोर
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com