सहावीतील मुलाचा गळा आवळून खून, मृतदेह उसाच्या पाचटाखाली लपवून ठेवला

Ahmednagarlive24
Published:

गुन्हेगारी घटनांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) असे मृत मुलाचे नाव असून ही घटना हिवरे (ता. कोरेगाव) येथे घडली आहे.

विजय आनंदराव खताळ (वय३६) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी घडली. शनिवारी विक्रम व त्याचे आई वडील हिवरे येथील कुंभारकी शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते.

दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान विक्रम याची आई घरी आली होती. त्यानंतर एक तासानंतर विक्रम व त्याचे वडील पाठीमागून आले. पण विक्रमची चप्पल शेतात राहिल्याचे विक्रमच्या लक्षात आल्याने तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात माघारी परतला.

परंतु मुलगा बराचवेळ घरी न आल्याने आईने गावात शोधाशोध केली. पण तो सापडत नसल्याने सायंकाळी ७ वाजता गावातील नितीन खताळ यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे फोन करून गावातील लोकांना विक्रम बेपत्ता असल्याबाबत सर्वाना माहिती दिली.

परिसरात बिबट्याची दहशत असल्याने गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले व कवडेवाडी शिवार व कुंभारकी शिवारात शोध मोहीम सुरु केली. कुंभारकी येथील उसाच्या शेतात प्रत्येक सरित शिरून त्याचा शोध घेण्यास सुरवात केली.

उसाच्या एका सरीत उसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रम याचा मृतदेह युवकांच्या नजरेत पडला. ही घटना समजताच वाठार पोलीस, श्वान पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe