अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटींच्या गुटख्याची तस्करी

Ahmednagarlive24
Published:

औरंगाबाद लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी काही वाहनांना परवानगी दिली आहे. परंतु या वाहनांचा दुरुपयोग करत गुटख्याची तस्करी करताना आरोपीस पकडले आहे.

औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आला.

कर्नाटकमधून सोलापूर-अहमदनगर मार्गे बीडबायपास रोडने एक टाटा ट्रकमध्ये गुटखा घेऊन येत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

याप्रकरणी 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून दररोज गुटखा येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती,

त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आलीय. एक ट्रकमध्ये भाजा आणि फळांचे ट्रे ठेवून ही वाहतूक सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment