तर ऊर्जामंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ! चंद्रकांत पाटील यांची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-वीज बिल थकबाकी असणाऱ्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल, मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर आपल्याला मंत्रीपदाचे सर्व अधिकार हवे असतील तर यातनाही सहन करायच्या असतात. नितीन राऊत अशाप्रकारे जबाबदारी झटकू शकत नाहीत.

त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे पैसे मागितले पाहिजे. पण तसं तुम्ही काही करणार नाहीत. याउलट मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी सोपवणं चालणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe