अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : सध्याचे राज्याचे राजकारण पहिले तर महाविकास आघाडी उत्तम कार्य करत आहे. जनताही या कार्यामुळे समाधानी आहे.
परंतु काही लोक महाविकास आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात भक्कम आहे.
काही जण आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहतात, परंतु आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी आघाडीत बिघाडी होणार नाही याची अजिबात काळजी करू नये,
असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला. तसेच कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात २ लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली.
या कर्जमाफीच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कारण तिथे आचारसंहिता सुरु होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
तसेच कोरोना संकट आल्यानंतर राज्य शासनाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली, ही वस्तुस्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करावाच लागतो.
याशिवाय इतरही आवश्यक खर्च कारावे लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आवश्यक आहे, ते करावं लागत आहे. दुसरीकडे उत्पन्नात घट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शासन उपाययोजना करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews