सोलापूर : संचारबंदी आदेशाचा भंग करून मित्राच्या वाढदिवसाला उपस्थित राहून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई विनायक रामजी काळे (बक्कल नंबर ८१ ) त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसाला निलंबित केले आहे. घटनेची हकीकत अशी की करमाळा तालुक्यातील फिसरे येथील विकास विठ्ठल ननवरे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना निमंत्रित केले होते.
या कार्यक्रमात वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आलाय हातात तलवार घेतलेले फोटो व्हॉट्सॲपवर टाकून व्हायरल केल्याची गंभीर दखल पोलीस अधिक्षकांनी घेतली.