गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार करणार असे काही …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कर्जत-जामखेड मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शहर आणि गांव घेऊन या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवू, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

कर्जत-जामखेड मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन

पोलीस उपअधीक्षक संजय सातव,कर्जतचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड,जामखेडचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा केली.

यात त्यांनी उपविभागातील घडलेल्या गुह्यांचा आढावा घेऊन उपविभागीय कार्यालय, पोलिस ठाण्यातील कर्मचारी संख्या, मुलभुत सुविधा,पोलिस वसाहतीच्या दुरावस्था आणि त्याबाबत नविन बांधकामासंदर्भात काही अडचणी आहेत का?,

महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठीच्या असणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन कर्जत-जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही शहरे तसेच मतदारसंघातील

राशिन, मिरजगाव, खर्डा अशी महत्त्वाची गावे सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निगराणीत घेऊन गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो प्रकल्प राबवू.

या प्रकल्पाचे नियंत्रण उपविभागीय कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या निगराणीत ठेवण्याचा विचार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment