अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे.
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये आज बैठक झाली.
या बैठकीनंतर ते बोलत होते. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडीनंतर नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप हे माध्यमांशी बोलत असताना
त्यांना भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात आहेत का ?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, ‘आहेत. निश्चित रूपाने येत्या काळात अनेक लोक येतील.
याबाबत आज माजी मंत्री कर्डिले यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved