अहमदनगर – एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणी साठी राज्यभर एसटी कर्मचारी संपावर आहेत. याचेच पडसाद नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देखील उमटताना दिसून येत आहे. आता या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे.
मनसे प्रत्येक वेळी या कर्मचा-यांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहीली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात विविध ठिकाणी मनसे या आंदोलनात सहभागी झाली आहे.
याचाच एक भाग म्हणून शेवगाव आगारातील कर्मचारी बांधवाना संपासाठी शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.
यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे बोलत होते. एस.टी. कर्मचा-यावर शासन कायमच अन्याय करत असून एस टी कर्मचारी आर्थिक, मानसिक व शारीरिक अडचणीत आणण्याचे पाप महाविकास आघाडी करत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.
शासनाने लवकरात लवकर एसटीचे शासनात विलिनीकरण करावे अन्यथा राज्यभर मोठ्या आंदोलनाचा भडका उडेल व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.