अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचेमार्फत दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन पध्दतीने राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महारोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.in या वेब पोर्टलवर नोंदवलेली आहेत व नोंदवत आहेत तरी सदर महारोजगार मेळाव्यामध्ये वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन पध्दतीने (उदा.व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, व्हॉट्स अॅप, स्कायपी, टेलिकॉलींग आदी) घेण्यात येणार आहेत.
या महारोजगार मेळाव्यामध्ये एसएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर इ. पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या वेबसाईटवर नोकरी नोंदणी नसल्यास नोंदणी करुन घ्यावी. तसेच युजर आयडी व पासवर्डने लॉगीन होऊन ऑनलाईन अर्ज करावा.
हामेळावा ऑनलाईलन असल्याने अपेक्षित कंपन्यांना अप्लाय करणे बंधनकारक राहील. तसेच या पोर्टलवर महाराष्ट्रातील विविध नामांकित उद्योजक त्यांच्याकडील रिक्तपदे दररोज नोंदवत असल्याने उमेदवारांनी अद्यावत रहावे. या संधीचा लाभ अहमदनगर जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर कार्यालयाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0241-2425566 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved