अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून संपूर्ण देशांमध्ये शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे कायद्याविरोधात निवेदन घेण्याची सुरुवात केली होती.
आज महाराष्ट्रामधील जमा झालेले निवेदनांचा ट्रक दिल्लीतील काँग्रेस कार्यालय येथे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे रवाना करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एस के पाटील व महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि नेते उपस्थित होते.
हे सर्व निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार असुन या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र काँग्रेसकडून अशाप्रकारे शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले होते
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचे निवेदन सात लाखांच्यावर गेले असून दिवाळीनंतर पुन्हा या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला मंत्री असलम शेख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp