‘कदम कदम बढाये जा, कोरोना को हटाये जा’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज 158 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 66 हजार 291 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 96.91 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 116 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1080 इतकी झाली आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या :66291
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : 1080
  • मृत्यू :1036
  • एकूण रूग्ण संख्या : 68407
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe