अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत परराज्यातील एका तरुणीची सुटका केली.
हे पण वाचा :- वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार !
व्यवसाय चालविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. गुलमोहोर रोड येथील एका अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती.
हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मिटके, कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ व कर्मचाऱ्यांनी फ्लॅटवर छापा टाकला. या वेळी फ्लॅटमध्ये परराज्यातील एक तरुणी आढळून आली.
हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !
हा व्यवसाय चालविणाऱ्या अमर उर्फ विकी गोपालदास शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने सुरुवातीला आपले आडनाव साळुंखे असल्याचे खोटे सांगितले होते.
हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !
चौकशीनंतर त्याचे आडनाव शर्मा असल्याचे आढळून आले. तो नगरमधील तारकूपर येथील इंद्रा कॉलनी येथील रहिवासी आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास
त्याच्याविरुद्ध स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून
तरुणी ही उत्तर प्रदेश राज्यातील असून, तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी शर्मा याने एका व्यक्तीचा फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला होता.याबाबत कागदोपत्री करार करण्यात आला होता. परंतु त्या ठिकाणी शर्मा हा वेश्याव्यवसाय करून घेत होता.