अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयोगाच्या घोषणेसोबत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता जारी झाली आहे.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत.
दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत होत असते. एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकी संदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतींच्या २ हजार ६५० प्रभागातून एकूण ७ हजार २३४ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये