पुणे :- विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, वर्गात उत्तरे देत असल्यामुळे शिक्षकांकडून ओरडा खावा लागत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शाळेत शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची एका विद्यार्थ्याने पटापट उत्तरे दिल्यामुळे शिक्षक वर्गातील इतर विद्यार्थ्यांना रागावले. त्याचा राग मनात धरून मधल्या सुट्टीत सात विद्यार्थ्यांनी मिळून उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर सय्यदनगर मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला. याबाबत १५ वर्षीय मुलाच्या पालकांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हा प्रकार हडपसर येथील सय्यदनगर मधील गुलाम अलीनगर मधील शाळेत २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घडला. फिर्यादी यांचा मुलगा सय्यदनगर येथील शाळेत शिक्षण घेत असून तो हुशार आहे.
घटनेच्या दिवशी शाळेची मधली सुट्टी झाली असताना, वर्गातील सात विद्यार्थ्यांनी फिर्यादीच्या मुलाला तुझे सबकुछ कैसे आता है, हर सवाल का जवाब तु क्युं देता है, तुम्हारे कारण टिचर हमें डाटते है’ असे म्हणून सातही जणांनी मुलाला शिवीगाळ केली.
त्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी व खिडकीच्या पडद्याचा पाईप काढून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.