डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगतापांवर लाखो रुपयांचा सट्टा !

Published on -

अहमदनगर :- भाजपचे सुजय (दादा) विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम (भय्या) जगताप यांच्यात झालेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आता तर निकालाच्या दोन दिवस आधीच दादा आणि भय्या यांच्यावर लाखो रुपयांचा सट्टा लागला आहे. दादा आणि भय्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच.

शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

मात्र, तोपर्यंत जिल्हाभरातील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निकालासाठी अवघे काही तास उरलेले आहेत.

बुधवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. गावागावात, चौकाचौकात, कॉलेज कट्टे एवढेच नाही, तर घरोघरी निकालावर चर्चा झडत आहेत.

अनेकांनी पैंज लावलेली आहे. कुणी पार्टी देण्याची, तर कुणी रोख रक्कम देण्याची पैंज लावलेली आहे. शेवटचे दोन दिवस दोन्ही उमेदवारांवर बुकींकडे लाखो रुपयांचा सट्टा लागलेला आहे.

तरुण मतदार, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, राजकारणाची आवड असणारे, कामगार, नोकरदार असे अनेकजण या सट्ट्याला बळी पडले आहेत. एक हजार रुपयांपासून, तर एक लाख रुपयांपर्यंत हा सट्टा लावण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News