अहमदनगर :- सभामंडपासाठी अर्धी टक्केवारी मागणारे खासदार हे देवाचे सुद्धा झाले नाही तर माणसांचे कसे होणार ?
‘विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.अशी टीका डॉ. सुजय विखे यांनी केली.तिसगाव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले, ‘मला एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी २५ वर्ष हटणार नाही. या भीतीने आपल्याला उमेदवारी दिली जात नाही.
माझ्या उमेदवारीने अनेकांची दुकानदारी बंद होणार आहे. मला तिकीट देऊ नये, यासाठी ही प्रस्थापित मंडळी माझ्या उमेदवारीला विरोध करीत आहेत.
दक्षिणेतील सर्व पुढारी एकत्र झाले तरी ते मला पाडू शकत नाहीत. सध्या रोज वर्तमानपत्र उघडले की नवीन उमेदवाराचे नाव वाचायला मिळत आहे.
लोकसभेची उमेवारी सध्या तरी लहान मुलांच्या लॉलीपॉप सारखी झाली आहे. या मंडळींनी किती जण नादाला लावले आहेत, ते कळतच नाही.
जे कधीही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फिरत नाही. दुष्काळात शेतकऱ्यासाठी चारा, पाणी देण्यासाठी एक रुपया खर्च करण्याची ज्याच्यात दानत नाही,
असे लोक घरात बसून खासदार व्हायचे स्वप्न बघत आहेत. या पुढाऱ्यांनी हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवावे.