…आणि सुजय विखेंनी मानले शरद पवारांसह बाळासाहेब थोरातांचे आभार !

Published on -

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. 

डॉ. सुजय विखे म्हणाले, या मतमोजणीतील आघाडीसाठी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.

विखे यांनी ही जागा काँग्रेससाठी सोडण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार यांनी विखे यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी करण्याची अट घातली

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राधाकृष्ण विखे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. या सर्व घडामोडीनंंतर डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बाळासाहेब थोरात यांनीही विखेंविरोधात जोरदार मोहीम राबविली होती. त्यामुळेच मतमोजणीतील आघाडीनंतर डॉ. सुजय विखे यांनी अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe