डॉ सुजय विखेंची उमेदवारी जनतेची

Published on -

पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे.

विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले.

त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा, म्हसे, देविभोयरे येथे विखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन मार्गदर्शन केले. निघोज येथील बैठकीत ते बोलत होते.

या वेळी माजी आमदार नंदकुमार झावरे, शिवाजी जाधव, जि. प. सदस्या पुष्पा वराळ, दिनेश बाबर, सचिन पाटील, बबुशा वरखडे, शिवाजी डेरे, रंगनाथ वराळ, किसन सुपेकर, बाबाजी लंके, रामदास रसाळ, गोरख ढवण, प्रकाश पांढरकर आदी उपस्थित होते.

File Photo

विखे म्हणाले, आपण पवार साहेबांना बधत नाही म्हणून उमेदवारीला विरोध करण्यात आला. मात्र गेली तीन वर्षे सुजय विखे यांनी मतदारसंघात मेळावे, आरोग्य शिबिर घेत जनतेचे प्रश्न सोडवले.

ही उमेदवारी जनतेची आहे. पुण्याच्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी आपले दक्षिणेचे पाणी पळवले. एकीकडे राज्यात सर्वांना धरणाचे समान पाणी मिळावे,

हे धोरण घ्यायचे व दुसरीकडे मात्र पुण्यातील पाणी आपल्याच भागातील लोकांना देण्याचा दुटप्पीपणा पवारांना कसा चालतो, हा प्रश्न विखे यांनी विचारला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe