सुजय विखे म्हणाले विधानसभेत मी त्यांचेच काम केले,पक्षाच्या आचारसंहितेचे …

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे शिवाजी कर्डिले यांचेच काम केले, असे स्पष्ट करत सर्व कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केले.

जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक विखेंनी घेतली. आपसातील गटतट, मतभेद विसरुन पक्ष संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करा.

कर्डिलेंसह आपण मतदारसंघाचा दौरा करणार असून यापुढे पक्षाशी एकनिष्ठ न राहणाऱ्याला माझ्याकडे कोणताही थारा मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, मी पक्षाचे एकनिष्ठतेने काम केले, अशी ग्वाही विखे यांनी दिली. दरम्यानच्या काळात कर्डिले व विखे यांचा मतदारसंंघात फारसा संपर्क राहिला नव्हता.

त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. या पार्श्वभूमीवर विखे यांनी आता मतदारसंघात भेटी घेऊन समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. कर्डिले व मी पक्षाचे संघटन करणार अाहोत. त्याबद्दल शंका बाळगू नये, असे विखे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe