12 – 0 च्या अपयशावर खासदार डॉ.सुजय विखे म्हणतात ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- जिल्ह्यात 12-0 हा नारा उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. पण आम्हला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही.अपयश का आले ? याची कारणे शोधले जातील.आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सर्वांना गरज आहे.

या निकालापासून मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. एक ते दोन महिन्यात जिल्ह्यातील अपयशाचे सर्व कारणे शोधले जातील असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

दरम्यान आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असे कोणी अधिकृत वक्तव्य केले नाही. त्यामुळे यावर बोलण्यात अर्थ नाही. जोपर्यंत याबाबत कोणी अधिकृत बोलणार नाही, तोपर्यंत मी यावर काही बोलणार नसल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले.

जिल्ह्यधिकारी कार्यलयात आज बुधवारी खा.विखे आले होते. त्यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना विखे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत खासदार म्हणून जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या. त्यानंतर देखील अपयश आले.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती होती, म्हणून मला मताधिक्य मिळाले होते. बारा शून्याचा नारा हा उमेदवारांचे मनोबल वाढविण्यासाठी दिला होता. बीड, नाशिक, शिरूरसह ग्रामीण भागात अनपेक्षित निकाल लागले आहेत.

त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात देखील यश मिळाले नाही. जे पराभूत झाले त्यांच्याविषयी आम्हाला दुःख वाटत आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील उमेदवारांच्या पराभवाची कारणे शोधली जाणार असून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

त्यातून प्रत्येकांची पराभवाची कारणे समोर येतील. त्यातून कोणाचा पराभव कशामुळे झाला याचे आम्ही सर्वजण आत्मपरीक्षण करणार आहोत.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होते. त्यामुळेच मला खासदारकीच्या निवडणुकीत मताधिक्या मिळाले, माझ्या दक्षिण लोकसभा मतदार संघात चार आमदार निवडून आले आहेत. यांची अडचण मला माझ्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे पराभवाची कारणे मी स्वतः जाणून घेणार आहे.

तसेच विखेची संपूर्ण यंत्रणा भाजपत होती.ती कायमच राहणार आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा शेवटपर्यंत प्रचार करत होता. आम्ही जनतेसाठी काम करतो. पक्षणे जी जबाबदारी दिली होती ती आम्ही समर्थपणे सांभाळली.

अनेक मतदारसंघात सभा देखील घेतल्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन विनंती केली. लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत काय निर्णय घेतले, याचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत.

मला दुःख वाटत आहे की, आम्हाला जो अपेक्षित निकाल होता, तो लागला नाही यात माझे देखील मोठे नुकसान आहे, पक्षाने आमच्याकडे विचारणा केल्यास आम्ही त्यांना उत्तर देऊ असे खा.विखे पत्रकाराशी बोलताना म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment