पारनेर :;- यापुढील काळात पक्षापेक्षा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचे सूचित करत माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
ढवळपुरी येथे वाघवाडी ते गावाडे वाडी रस्त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राजकीय भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीसाठी झावरेे यांच्यासह प्रशांत गायकवाड, नीलेश लंके यांची नावे चर्चेत असून पक्षश्रेष्ठींकडून लंके व गायकवाड यांनाच पाठबळ दिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर नव्याने पक्षात दाखल झालेल्या व्यक्तींना उमेदवारी न देण्याची मागणी झावरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती.
- अहिल्यानगरमधील बसस्थानके बनलेत गुन्हेगारांचे अड्डे, महिलांच्या दागिने-पैश्यांची सतत चोरी, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत
- Astrology: 15 जूनपर्यंत ‘या’ 3 राशींना मिळणार धन,यश आणि सन्मानाची भेट
- Bhadra Rajyog: भद्र राजयोगमुळे ‘या’ 3 राशी होणार करोडपती, तुमची राशी आहे का यात?
- अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर, इच्छुकांची नजर आयोगाच्या निर्णयाकडे
- Business Success Story: ‘हा’ तरुण दही विकून झाला कोट्याधीश! अंबानी,बिल गेट्सही आहेत ग्राहक