अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-नुकत्याच काही दिवसांपूर्वी साताराहून सोलापूरमध्ये नव्याने आलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलातील कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. कामयच ड्यूटीला प्राधान्य देणार्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारीर्यांना कधीच निवांत आणि मनमोकळी सुट्टी भेटत नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ देता येत नाही.
तसेच त्यांना सण आणि घरातील आनंदाचे कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात तणाव निर्माण होऊन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. म्हणून पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा,
यासाठी त्यांना एकदिवस निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी सातपुते यांनी घेतला. दरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत म्हटले की, “तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
या निर्णयामुळे पोलीस आपला खास दिवस कुटुंबीयांसोबत साजरा करू शकतील. यामुळे पोलीस तणावमुक्त होऊन नव्या जोमाने व प्रचंड उत्साहाने काम करतील, याची मला खात्री आहे.
” तेजस्वी सातपुते या आपल्या धडकेबाज कामामुळे प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी पोलिस दलात महत्वाची भूमिका निभावली आहे. यापूर्वीही पुणे, अहमदनगर, सातारा येथे काम करत असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved