अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
आ.जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, प्राजक्त तनपुरे,निलेश लंके,आशुतोष काळे,डॉ.किरण लहामटे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

आ.जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी आशा समर्थकांना होती.उत्तरेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना यापूर्वीच कॅबिनेटमंत्रीपद मिळाले आहे.
त्यामुळे दक्षिणेत आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी चर्चा होती.संभाव्य मंत्रीपदाच्या यादीतही आ.जगताप यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र,राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या मंत्रीपदाच्या यादीत आ.जगताप यांचे नाव न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान,आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद न मिळाल्याने आम्ही नाराज असून आ.जगताप यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा राजीनामा देणार असल्याचे शहर जिल्हा सचिव नीलेश बांगरे यांनी सांगितले.