सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती !

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली :- राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही.

दरम्यान राज्यातील भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले आहे.

सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात सामिल होतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले असून ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सरकार स्थापन केल्याने संघही खुश आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संघाचे पदाधिकारी नाराज आहेत.

भाजपत एखादी बाहेरची व्यक्ती आल्यास पक्षाच्या नेत्यांना अडचण भासत असेल. पण संघ परिवार बाहेरच्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. यामुळे संघाचा विस्तार होतो. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यात भाजपविरोधात आक्रमकता दिसून येत नाही. ते चतुर खेळाडू आहेत.

ज्याप्रकारे बिहारमध्ये नितीशकुमारांना एनडीएत आणणारे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी केले, त्यांना भाजपकडून राष्ट्रपतिपदाचे बक्षीस मिळाले. त्याच प्रकारे महाराष्ट्रात सत्तास्थापनेत मूकसंमतीचे बक्षीस शरद पवार यांना राष्ट्रपती बनवून भाजप देऊ शकते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment