सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटायला जातात, त्यानंतर लगेचच आज पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात.

काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मुर्ख नाहीत. जसं जसं दिवसं जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहेत. म्हणून रोज धडपड सुरु आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी प्रत्यक्षपणे पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे.

एकीकडे भाजपकडून सातत्यानं मुंबई पोलिस व राज्य सरकारवर आरोप होत असताना. आघाडीतील नेत्यांनी मात्र मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये.

असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. तसंच, बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळी भाजू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवरील वाद रंगल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणही चांगलंच तापलं आहे. या वादात आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe