अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथे एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना डीजेच्या तालावर नाचताना हातात तलवार घेऊन एक जण नाचल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.
या प्रकरणी गुरुवारी दहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे (रा. फुंदेटाकळी) यांच्यासह दहा जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचा भंग करणे, शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस कर्मचारी किरण बडे यांनी फिर्याद दिली आहे.