अहमदनगर करानो काळजी घ्या : देशातील टॉप १० जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-लसीकरण मोहीम वेगाने होत असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.

त्यात नाशिक व अहमदनगरचा समावेश आहे. यापुर्वी महाराष्ट्रातील नऊ जिल्हे होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासोबतच पंजाब, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक आहे.

महाराष्ट्राचा आठवडाभराचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २३ टक्के आहे. केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे ३ लाख ३७ हजार ९२८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

आतापर्यंत ५४ हजार २८३ रुग्णांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ३६ पैकी ८ म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे.

केंद्र सरकारने देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी जारी केली आहे, जिथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे आहेत.

यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत तर कर्नाटकातील फक्त एका जिल्ह्याचा समावेश आहे.

राज्यातील आठ जिल्हे :-

  1. नाशिक
  2. अहमदनगर
  3. पुणे
  4. मुंबई
  5. नागपूर
  6. ठाणे
  7. औरंगाबाद
  8. नांदेड

देशातील इतर दोन जिल्हे :-

  1. दिल्ली
  2. बंगळूर
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe