जाऊन घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे हा चढउतार पाहायला मिळत आहे.

दरम्यान आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जगातील बर्‍याच भागांत सोन्या-चांदीच्या किंमती वाढताना दिसून आल्या.

पण कोरोना लशीबाबत सकारात्मक बातमी आल्यानंतर बाजारात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याचांदीच्या किंमतींवर झाला आहे.

गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे दरही आज कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.9 टक्क्यानी कमी होऊन 49,051 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 550 रुपये अर्थात 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 59,980 रुपये प्रति किलो झाले आहेत.

विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात आता सातत्याने घट होताना दिसत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment